Print

शाळेची प्राथमिक माहिती

वर्गव्यवस्था
पूर्व माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व वर्ग सकाळी असतात.  माध्यमिकचे सर्व वर्ग दुुपारी असतात. 

माध्यम :
शासकीय नियमानुसार वर्ग ५ ते १० पर्यंत अंशतः इंग्रजी माध्यमाची सोय आहे.  अंशतः इंग्रजी माध्यमाचे प्रत्येक वर्गाचे ५ विभाग आहेत.  नवीन प्रवेशाबाबत मुख्याध्यापकांचा निर्णय अंतितम असतो.  पूर्णतः इंग्रजी माध्यमाची सोय नाही.  येथील अंशतः इंग्रजी माध्यमांच्या वर्गांना केवळ गणित व विज्ञान हेच वर्ग इंग्रजीतून शिकविले जातात.  क. म. वि. च्या वर्गांना इंग्रजी माध्यम आहे. 

द्वितीय भाषा :
वर्ग ५ ते ७ मध्ये हिंदी हा विषय द्वितीय भाषा राहील.  वर्ग ८, ९, १० मध्ये द्वितीय भाषा संस्कृत आहे. 
कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्ग ११ व १२ ला फक्त विज्ञान शाखा उपलब्ध आहे.  त्यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र तसेच मराठी किंवा संस्कृत आणि इंग्रजी हेᅠ आवश्यक विषय आहेत.  जीवशास्त्र ऐवजी संगणकशास्त्र हा विषय घेता येतो.  संगणकासाठी २५ प्रवेश उपलब्ध आहेत.  संगणक विषय विनाअनुदानित तत्वावर सुरु केला असल्याने विद्यार्थ्यांना त्यासाठी नियोजित शुल्क द्यावे लागते. 

प्रवेश :
मंजूर जागा रिक्त नसल्यामुळे वर्ग ६ ते १० पर्यंत कोणत्याही वर्गात प्रवेश देता येणे शक्य होत नाही. 

वर्ग ११ मध्ये प्रवेश : 
एस. एस. सी. परीक्षेच्या निकालानंतर लगेचच दुसर्‍या दिवसापासून कँपस कोटया अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज वाटपाचे काम सुरु होते.  उर्वरित प्रवेश केंद्रीय पध्दतीने केल्या जातात. 

वर्ग १२ मध्ये प्रवेश :
वर्ग ११ च्या परीक्षेत उच्च टक्केवारीने पास होणार्‍या निवडक विद्यार्थ्यांना जागा असल्यास प्रवेश मिळू शकतो. 

प्रार्थना :
शाळेमध्ये सकाळ व दुपार या दोन्ही विभागांमध्ये सर्वांनी मिळून वर्गवार रांगांमध्ये उभे राहूनᅠप्रार्थना म्हणायची असते.  प्रार्थनेला वेळेवर आणि गणवेश घालूनच उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 
प्रत्येक वारासाठी वेगळी प्रार्थना असून ती बासरीवरील स्वरात म्हणायची असते.  यावेळी वातावरण शिस्तबध्द व प्रसन्न असणे आवश्यक असते. 

गणवेश : 
शाळा समितीने ठरविलेल्या गणवेशात शाळेत येणे अनिवार्य आहे. 
मुले वर्ग ५ ते १२
शर्ट : लालसर कथ्था चेक्स
पँंट : डार्क अ‍ॅश कलर
बुट : काळे
सॉक्स : पांढरे 

मुलीे वर्ग ५ ते १२
कुर्ता : लालसर कथ्था चेक्स
जॅकेट  : डार्क अ‍ॅश कलर
सलवार : डार्क अ‍ॅश कलर
बुट : काळे
सॉक्स : पांढरे 

शिक्षण शुल्क :
शासकीय नियमानुसार वर्ग ५ ते १० साठी शिक्षण निःशुल्क आहे.  क.म.वि. च्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे शुल्क भरावे लागते. 

वर्ग ११ वा :    

शिक्षण शुल्क         रु.     २१६
सत्र शुल्क             रु.      ३६
प्रयोगशाळा शुल्क    रु.     ७०
                            ---------------- 
            एकूण               ३२२ 

वर्ग १२ वा :    

शिक्षण शुल्क             रु.     २४०
सत्र शुल्क                 रु.      ४०
प्रयोगशाळा शुल्क        रु.    ७०
                            ---------------- 
            एकूण                  ३५० 
   

1)    समर्थ शाळेला १९९९ वर्षापर्यंत  ६५ वर्षांची परंपरा लाभली. या कालावधीत २०,००० हून अधिक विद्याथी शाळेतून शिकून बाहेर पडले. आणि देशविदेशात नावलौकिकात भर टाकित आहेᅠ. उत्तम गुण संपन्न व चारित्र्यवान विद्याथी घडविणे हेᅠआजही शाळेचे ध्येय आहेᅠे.
2)    याचवषी संगणक विभागाची स्थापना झाली. इ. ११ वी १२ वी ला सुध्दा संगणक विषय सुरूᅠझाला.
      1)    संस्थेत  शाळेत राबविण्यात येणारेᅠ विविध उपक्र्र्रम
      2)    राष्ट्रीय कॅडेकोरमध्ये सहभागी होता यावे तसेच विद्यार्थ्याचा नैतिक व सामाजिक विकास व्हावा या उददेशाने एन.सी.सी. चे स्वतंत्र युनिट सुरूᅠझाले.
      3)    विविध उपक्रम - एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा, हस्ताक्षर, राखी, कार्ड अशा विविध स्पर्धा घेण्यात येतात.
      3)    तालुका विज्ञान प्रदर्शनीमध्ये दरव्‌र्षी प्राथमिक , माध्यमिक गटातून प्रतिकूती सादर केल्या जातात. विज्ञान मेळाव्यातही विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.
      4)    शाळेत वर्ष भरात होणा-या वक्तूत्व स्पर्धा राष्ट्रभाषा हिंंदी परीक्षा, संस्क्ूत कथाकथन स्पर्धा, संस्कूतीज्ञान, विज्ञान प्रश्न मंजूषा टारगेट एन.टी.एस., एम.टी.एस. एन.टी.एस. ऑलिम्पीयाड गणित संबोध, गणित प्राविण्य स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आल्या.
डिसेंबर २२ ते  २४ डिसेंबर दरम्यान ३४ वे जिल्हापरिषद जिल्हा स्तरिय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

 

गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणारेᅠ विशेष पुरस्कार

1) कै. प्रा.वा.ब. ऊर्फ बाळासाहेब बेनोडेकर स्मूति पारितोषिक
एस.सी.सी. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
१) शाळेतून प्रथम क्रमांक
२) शाळेतून व्दितीय क्रमांक
३) मुलींमधून प्रथम क्रमांक
४) मराठी विषयात प्रथम क्रमांक
५) गणित प्रथम क्रमांक
६) मराठी भाषा सोडून इतर भाषांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त
७) विज्ञान विषयात प्रथम क्रमांक
८) सामाजिक शास्त्र (इतिहास + राज्यशास्त्र भूगोल - अर्थशास्त्र)

२) कै. सारंग रघुपत देशपांडे स्मृति पारितोषिक एस.एस.सी. परीक्षेत शाळेतून प्रथम येणार्‍या विद्यार्थी / विद्यार्थीनीस.

३) कै. वि.दा.ब्रम्ह (आप्पा साहेब) स्मृति पारितोषिक
वर्ग ८ आणि ९ मधील तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

४) कै. राधाबाई क्‌ृष्णाजी भिडे स्मृति पारितोषिक
एस.एस.सी. परीक्षेत संस्कृत विषयात शाळेतून सर्वाधिक गुणप्राप्त.

५) कैᅠ.नी.त्र्य.राजदेरकर स्मृति पारितोषिक
एस.एस.सी. परीक्षेत विज्ञान विषयात सर्वाधिक गुणप्राप्तकर्त्यास, एस.एस.सी. परीक्षेत सामाजिकशास्त्र ( इति-राज्य. + भूगोल-अर्थ) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्याथी किंवा विद्या्‌र्थीनीस.

६) कैᅠग.ना.लेले ( माजी मुख्याध्यापक ) स्मृति पारितोषिक
एस.एस.सी. परीक्षेत खालील विषयात सर्वाधिक गुण प्राप्तकर्त्यास
१) मराठी
२) संस्कृत (पूर्ण)
३) वर्ग ५ ते ९ आणि वर्ग ११ मधील तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

७) कै. नी.त्र्यं.राजदेरकर स्मृति पारितोषिक
इयत्ता ९ वी मधून संस्कृत (पूर्ण) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

८) कै. सत्यवतीबाई प्रभाकरराव तारे स्मृति पारितोषिक
एस.एस.सी. परीक्षेत संस्कृत (पूर्ण) या विषयात शाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

९) कै. प्रभाकरराव रघुनाथराव .ऊर्फ आबासाहेब तारे स्मृति पारितोषिक
एस.एस.सी. परीक्षेत इंग्रजी या विषयात शाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

१०) कै. सतीशचंद्र धनारामजी बन्सोड स्मृति पारितोषिक
१) एस.एस.सी. परीक्षेत गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

११) कै. दत्तात्रय मुकुंद ओहळे स्मृति पारितोषिक
१) एस. एस. सी परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस
२) एस. एस. सी परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१२) कै. ग. ना. लेले (माजी मुख्याध्यापक ) स्मृति पारितोषिक
एस. एस. सी परीक्षेत संस्कृत (पूर्ण) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१३) कै. सीताराम गोविंंदराव पाटील स्मृति पारितोषिक
एस. एस. सी परीक्षेत संस्कृत (पूर्ण) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१४) कै . उषाताई त्र्यंबकराव देशपांडे स्मृति पारितोषिक
एच. एस. सी. (वर्ग १२) परीक्षेत जीवशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१५) कै. रेणू सुरेंद्र अघोर स्मृति पारितोषिक
इयत्ता ९ वी च्या सर्व विभागातून सर्वाधिक गुण प्राप्त विद्या्‌र्थीनीस.

१६) कै. व्यंकटेश भगवंतराव देशपांडे (जिंतूरकर) स्मृति पारितोषिक
एस. एस. सी परीक्षेत विज्ञान विषयात शाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१७) कै. दिगंबर रंगनाथ अंजनकर, अकोला स्मृति पारितोषिक
एस. एस. सी परीक्षेत मराठी विषयात शाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस

१८) प्रा. मंगला जोशी पुरस्कृत कै .ग. ना. लेले स्मृति पारितोषिक
१) एच. एस. सी. (वर्ग १२) परीक्षेत संस्कृत या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.
२) इयत्ता ८ वी ते १० करिता संस्कृत भाषेत वक्तृत्व स्पर्धेकरीता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची तीन पारितोषिके.

१९) कै. श्री. गोवींदराव आठवले स्मृति पारितोषिक
तर्फे सौ. अपर्णा आठवले इ. ७ वी माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी.

२०) स्व. आशाताई गडकरी स्मृति पारितोषिक
तर्फे श्रीमती उषाताई चौधरी माजी खासदार यांच्यातफेर्ᅠ एस. एस. सी. परीक्षेत इतिहास-राज्यशास्त्र सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास / विद्या्‌र्थीनीस.

२१) स्व. मधुकर आनंदराव पांडे स्मृति पारितोषिक
तर्फे प्रभाकरराव आनंदराव पांडे देणगीच्या वार्षिक व्याजाच्या रकमेतून गरीब व होतकरू विद्यार्थ्याला शैक्षणिक दृष्टीने मदत.

२२) स्व. सौ. शुभदा त्र्यंबकराव शोभने स्मृति पारितोषिक
एस. एस. सी. परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास

२३) कै . लिंंगाप्पा भोगावकर स्मृति पारितोषिक
एस. एस. सी. परीक्षेत विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास

२४) श्री. अशोकराव भिलपवार (माजी शिक्षक) पुरस्कृत पारितोषिकेᅠ
१) गणित संबोध परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास
२) गणित प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास
३) शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग ७) सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यास

२५) श्रीमती उषाताई प्र. देवस्थळी पारितोषिक
गरीब व होतकरु विद्यार्थीनीस शैक्षणिक मदत

२६) अमृत महोत्सवी वर्ष सर्वोत्कृष्ट विद्यार्थी विशेष पुरस्कार
अमृत महोत्सवी वर्ष २००८-२००९ निमित्त संस्थेने घोषित केलेले विशेष पुरस्कार शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात, सर्वगुणसंपन्न सर्वोत्कृष्ट विद्यार्थी/विद्यार्थिनीस एकूण ५ पारितोषिके
१) वर्ग ५ ते ७ मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी २) वर्ग ५ ते ७ मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी
३) वर्ग ८ ते १० मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ४) वर्ग ८ ते १० मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी
५) वर्ग ११ ते १२ मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी/विद्यार्थीनी

२७) कै . कौस्तुभ संतोष बालेकर स्मृति पारितोषिके
१) एस. एस. सी. परीक्षेत शाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थी/विद्यार्थीनीस.
२) एस. एस. सी. परीक्षेत शाळेतून संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थी/विद्यार्थीनीस.
३) ब्राम्हण समाजातील हुशार, होतकरु, गरीब विद्यार्थी/विद्यार्थीनीस सत्र २०१२-१३ पासून शिष्यवृत्ती
दिली जाते.

२८) सौ. मृणालिनी काळे
वर्ग ९ च्या पाचही तुकडयांमधील प्रथम येणार्‍या विद्यार्थी/विद्यार्थीनीस.

२९) स्व. सौ. कमल जमनादास दायमा स्मृति पारितोषिक तर्फे श्री जमनादास दायमा, गरीब व होतकरु विद्यार्थ्यास ᅠ

 

परीक्षा
शाळेत घेतल्या जाणा-या परीक्षांचा सर्वसाधारण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. यात ऐन वेळी बदल होउ शकतो.
परीक्षा                          सर्व साधारण वेळ
प्रथम घटक चाचणी            सप्टेंबरचा तिसरा आठवडा २०१६
प्रथम सत्रान्त परीक्षा           २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१६
दुसरी घटक चाचणी            फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा २०१७
द्वितीय सत्रान्त परीक्षा        १ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७  

याशिवाय दोन्ही सत्रात स्वाध्याय मूल्यमापन केले जाते. प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात.  परीक्षांचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाते.  या सर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा वाषिर्ᅠक निकाल ठरविण्यात येतो. म्हणूनच कोणतीही परीक्षा गौण समजू नये.  विद्यार्थ्यांनी परीक्षेला गैरहजर राहू नये.  या गैरहजेरीमुळेᅠते अनुत्तीर्ण होऊ  शकतात.  उत्तीर्णतेसाठी लेखी परीक्षेत २५% गुण आवश्यक आहे.     

इतर परीक्षांसाठी विशेष वर्ग :  
शालेय परीक्षांच्या व्यतिरिक्त इतर परीक्षांना बसण्याची सोय शाळेमार्फत केली जाते.  

१) जवाहर नवोदय विद्यालयांतील प्रवेश पूर्व परीक्षा : वर्ग  ५ वी करिता.
२)माध्यमिक स्कॉलरशिपसाठी परीक्षा वर्ग ८ चे विद्याथी या परीक्षेला बसू शकतात.
३) एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग  परीक्षा वर्ग ७ ते १० चे विद्याथी यासाठी पात्र आहेत. शाळेत मार्गदर्शन उपलब्ध आहे.
४) महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांचे मार्फत आयोजित परीक्षांना शाळेतून तयारी करून   बसता येते.  मार्गदर्शन उपलब्ध आहे.  
५) एन.टी.एस. व एम.टी.एस. व एन.एम.एम.एस. परीक्षांना शाळेतून मार्गदर्शन केले जाते.  
६) याशिवाय गणित संबोध, गणित प्राविण्य व ऑलीम्पीयाड परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते.   

संगणक विभाग
        शासनाने सूचित केल्यानुसार शाळेध्ये संगणकाचे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  या संदर्भात पालक - शिक्षक सभा घेण्यात येऊ न या सभांमधून संगणक शिक्षण ऐच्छिक करण्यात आलेले आहे.
        संगणक शिक्षणासाठी वर्ग ५ मधील सर्व विद्यार्थ्यांनी वाषिक  शुल्क रु. ५००/- हेᅠ एकाच हप्त्यात प्रवेश घेतल्यानंतर भरावयाचे आहे.  हेᅠशुल्क वर्ग ६ ते १० मधील सर्व विद्यार्थ्यांनी एकाच हप्त्यात शाळा उघडल्यावर भरायचे आहे.  संगणक शिक्षण विना अनुदानित तत्वावर असल्याने त्याचा खर्च या शिक्षण शुल्कावर आधारलेला आहे.  शाळेमध्ये संगणक शिक्षणसाठी प्रयोग शाळेत अद्यायावत संगणक यंञणा बसविली असून त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था केलेली आहे.

ग्रंथालय
शाळेच्या ग्रंथालयात भरपुर पुस्तके, संदर्भग्रंथ असून विद्यार्थ्यांना पुस्तकेᅠघरी वाचण्यासाठी दिली जातात. वर्तमानपत्रे व काही नियतकालिकेही ग्रंथालयात उपलब्ध
असतात.

उपस्थिती
विद्यार्थ्यांनी शाळेत रोज उपस्थित राहणे आवश्यक आहे.  ५ वी ते  १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५% पेक्षा कमी असल्यास त्या विद्यार्थ्यांला परीक्षेस बसता येणार नाही. शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

विशेष अभ्यास वर्ग
अभ्यासात माघारलेल्यांसाठी अभ्यासवर्ग :- दहाव्या वर्गात जे विद्याथी अभ्यासात फार मागे राहिले आहेत त्यांचेसाठी विशेष वर्ग सुरूᅠू केले आहेत.
अभ्यासात प्रगत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग :- शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत प्रावीण्य प्राप्त व्हावे म्हणून हुशार व होतकरूᅠ विद्यार्थ्यांसाठी एक विशेष वर्ग शाळेत घेण्यात येतो. यामुळेᅠचांगल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी मदत मिळते.

सत्रातील अभ्यासपूरक नवोपक्रम
राष्ट्रीय छात्र सेना :- वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांना क्षमतेनुसार राष्ट्रीय छात्रसेनेत प्रवेश घेता येईल. या शाळेला ८० विद्यार्थ्यांला एक टूप मंजूर आहे. वर्ग ८ च्या विद्याथिनीना क्षमतेनुसार राष्ट्रीय छात्रसेनेत प्रवेश घ्‌ेता येईल. २५ विद्याथिनीना हा लाभ मिळूᅠ शकेल.

स्काऊट आणि गाईड
विद्याथिनीना त्यांच्या इच्छेनुसार गाईडच्या ग्रुपमध्ये प्रवेश घेता येतो.
स्काऊ ट गाईड अंतर्गत खरी कमाई उपक्रम - आनंद मेळावा घेण्यात येतो.