Print

अष्टदशकपू्‌र्ती  आनंद सोहळा २०१६
- आवाहन -


सादर सप्रेम  नमस्कार

श्री समर्थ शिक्षण संस्था अमरावती द्वारा स्थापित श्री समर्थ  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला ८० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्याप्रित्यर्थ संस्थेने २०१६ हेᅠवर्ष अष्टदशकपू्‌र्ती  आनंद सोहळा म्हणून साजरेᅠकरण्याचे ठरविले.  सध्याच्या संगणक, स्पर्धात्मक व अत्यंत धकाधकीच्या युगात श्री समर्थ विद्यालय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढेᅠजात आहे.आजवर प्राप्त केलेले यश व नावलौकिक, प्रतिष्ठा शाळेने जपून ठेवलेली आहे. वैदर्भातील नामवंत व सुसंस्कार देणारी शाळा म्हणून श्री समर्थ विद्यालयाकडे समाज बघत आहे. याचे सर्वश्रेय शाळेतील आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, पालक, हितचिंंतक आणि संस्था चालकांमधिल एकजूट, प्रामाणिकपणा, पारदर्शकता व शिक्षणाविषयी आत्मीयता निःस्वार्थ बुध्दी, सेवाभाव या सर्व विशेष गुणांना द्यावे लागेल.कोणतीहि संस्था एकटयाने चालू शकत नाही. हो,  एखादी व्यक्ती विशिष्ट अथवा उदात्त विचारांनी संस्था सुरू करू शकते त्याची स्थापना करूᅠशकते. मात्र अशा संस्थेचा विकास सर्वांच्या सहकार्याने, मदतीने त्याग व सेवाभावानेच होत असतो. श्री समर्थ शिक्षण संस्था व विद्यालय त्यापैकी एक आहे. या शाळेला घडविण्यासाठी आपल्या थोर गुरूजनांनी निःस्वार्थ सेवाभाव ठेवला आणि आपल्या सारख्या विद्यार्थ्यांना विद्या विभूषित केले. सर्वांना घडविले आहे. सध्याच्या संगणकीय नवीन युगात अतिशय प्रभावी ठरलेले माध्यम म्हणजे वेबसाईट, ज्या द्वारे माहिती व शिक्षणाची देवाण- घेवाण अत्यंत सुलभ व गतिशील झाली आहे, प्रचार- प्रसार माध्यमाचा वेग व दिशा कल्पनातीत सुधारीत वाढल्या आहेत. म्हणून श्री समर्थ वेबवाईटचे उद्‌घाटन संस्थेच्या वर्धापन दिनी म्हणजे १६ जुलै (१९३४) रोजी योजिले आहे. श्री समर्थच्या विद्यार्थ्यांसाठी खास मराठीतून शाळेची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणा सर्वांना नक्कीच आवडेल.

 'सबका साथ- सबका विकास' हा नारा देणा-या आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या विचारांने आपण ही सर्व म्हणू शकतो 'श्री समर्थ परिवार - आदर्श शिक्षक-विद्यार्थी पालक यांचा परिवार' येथे प्राप्त आहे सर्वांचा निःस्वार्थ सहकार

श्री समर्थ शाळेच्या झोळीत सर्वांकडून यथोचित भिक्षा पडावी हेᅠ नम्र आवाहन. त्याचा उपयोग शाळेच्या विकास कार्यात  प्रामाणिकपणे  केला जाईल याची आम्ही  खात्री  देतो. आपली अल्पशी  मदत  लाखो हजारो हातांद्वारे समर्थांच्या झोळीत आल्यास संकल्पपू्‌र्ती नक्कीच होईल कारण की सत्य संकल्पाचा त्राता श्री समर्थ त्यांच्या आशिर्वादाने हे कार्य सफल होईल होणार हा विश्वास आपण बाळगून आहोत.
आपली मदत राशी / दानराशी / निधी अष्टदशकपू्‌र्ती आनंद सोहळा २०१६ या नावाने स्टेट बँंक ऑफ इंडिया, नवाथे प्लॉट्‌स, बडनेरा रोड, अमरावती शाखेत
खाता क्र.३५७२९५९३९४६/००१७७५४ , IFSC Code :- SBIN0017754, MICR Code :- 444002113
मधे आपण जमा करू शकता. ही दानराशि आयकर कायदा नियम  ८० करमुक्त आहे.

जय जय रघूवीर समर्थ !


देवदत्त बोधनकर
माजी विद्यार्थी/ सचिव, श्री समर्थ शिक्षण संस्था,अमरावती.