Print

श्री समर्थ विद्यालयाती स्नेहसंमेलनाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न.
 अमरावती शहरातील एक अग्रगण्य असणाऱ्या  श्री समर्थ विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अत्यंत दिमाखदार पद्धतीने अॕड. सौ. लक्ष्मीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
       कार्यक्रमाची सुरूवात श्री वटक सरांच्या मार्गदर्शनातील सुश्राव्य स्वागत गीताने झाली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॕ. विनोद कोलवाडकर होते. उद्घाटक अॕड. सौ. लक्ष्मीताई पांगारकर , प्रमुख अतिथी , संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. मोहन पुरोहित , सचिव डाॕ. देवदत्त बोधनकर , ज्येष्ठ सदस्य श्री. रमेश डांगे शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पाठक, उपमुख्याध्यापक सचिन देवळे, पर्यवेक्षक पंकज देशपांडे व सौ. संगीता माथने व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सौ. सुवर्णा गणोरकर यांनी करून दिला. उद्घघाटनपर भाषणात अॕड. लक्ष्मीताई पांगारकर यांनी आपण श्री समर्थ विद्यालयाच्याच  विद्यार्थीनी असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. शालेय जीवनात वर्ग ५ मधे शिकत असताना तत्कालीन शिक्षक आदरणीय लेले सरांनी प्रथम दिलेल्या गीता श्लोक पठणाच्या संधीमुळेच आपण आत्मविश्वासाने आज समाजात स्वतःचे स्थान निर्माण केल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात शाळा व गुरू यांना नेहमी स्मरावे असे भावनिक आवाहन केले.
        अध्यक्ष म्हणून आपल्या रसाळ वाणीने विद्यार्थ्यांच्या हृदयाला हात घालत विद्यार्थ्यांशी संवाद साधत मैदानी खेळ व अभ्यास यांची सांगड घालत व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा असे त्यांनी प्रतिपादन केले.
        यावेळी वर्षभर विविध स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करीत बक्षीस पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्यावतिने  मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन गौरविण्यात आले. यांत राज्यस्तरीय बास्केटबाॕल संघाने १४ वर्षाआतील मुलींचा संघ हा यवतमाळ येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत जिंकून राज्यस्तरीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.  या संघात कु.अदिती गजानन ढगे , कु. कृपा राजेश देशपांडे , कु. प्रतीक्षा रवींद्र राजगुरे , कु. आस्था दिलीप भातकुलकर , कु. तन्वी प्रमोद गुल्हाने , श्वेता संजय पुंडेकर , कु. तन्वी पंकज जुननकर , कु. अनुष्का विजय खंडारे , कु. अनुष्का सुरेंद्र बोंडे , कु. वैभवी योगेश वरठी , कु. श्रद्धा सुनील चितळे , कु. पायल अनिल चितळे हे खेळाडू सहभागी होते तर १७ वर्षाआतील मुलांच्या संघात अनुज उमेश चापके , अजिंक्य विनोद गावंडे ,  सोहंम दिपक प्रांजळे , सोहम अनिरूद्ध भेरडे , प्रणव संदीप जंगले , रौनक विष्णुपंत इंगळे , समर्थ रविकिरण धांडे , सुजल सुधाकर कडगे , आदित्य सदानंद भोरळ , ओम जगदिश राऊत , ज्ञानेश बंडू धामणे ,  प्रणव नितीनराव नळकांडे सहभागी होते. बास्केटबाॕल संघ १९ वर्षाआतील मुलींच्या संघात वर्ग १२ तील कु. गौरी महेंद्र बोंडे , कु. वैष्णवी कोरडे ,  कु. नंदिनी अशोक गायकवाड , कु. वेदांती संजय ठाकरे , कु. प्रतीक्षा सुनील कुसराम , कु. प्रांजल अनिल गडवाले ,
कु. मोहिनी रमाकांत शुक्ला यांचा सहभाग होता. यांचीही निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
       वैयक्तिक खेळांमध्ये  लावण्य अमोल आखाडे , वर्ग ९ जलतरण स्पर्धा , तेजस वैश्य वर्ग ९ किक बाॕक्सिंग ,  व वुशू , वेदांत विलास आरोकार वुशू , उत्कर्ष निलेश पवार आष्टेडू आखाडा या खेळात प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्य पातळीवर निवड झाली आहे. यांचाही सन्मान स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
        राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत अमरावती जिल्ह्यातून प्रथम तर राज्यातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सार्थ पंकज शिरभाते याला गौरविण्यात आले , कु. कावेरी यमन शोभाने हीने संगीत कला केंद्र आग्रा युवावर्ग शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल , कु. मुक्ता अनिरूद्ध जोशी हीने राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ,  कु. रश्मी अमोघ आपटे हीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल , मल्हार सचिन गावंडे  याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडानृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना  पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
        शालेय विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सचिन देवळे यांनी  भारत सरकार आयोजित गांधीनगर गुजरात येथे ३६ व्या राष्ट्रीय खेळात ज्युडो खेळाचे टेक्निकल आॕफिशिअल  म्हणून कार्य केल्याबद्ल ,  डाॕ. राजेंद्र राऊत यांच्या '  लीळाचरित्रातील कथनरूपे ‘जननिष्ठ समीक्षा  '  या पुस्तकाला राज्य पातळीवर १० पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल , तसेच शाळेतील शिक्षक श्री विजय नवाथे यांनी शिर्डी येथे झालेल्या खेलो मास्टर्स अंतर्गत जलतरण स्पर्धेत राज्यपातळीवर दोन सुवर्ण पदक व एक रौप्य पदक प्राप्त करून राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक श्री वटक सर यांनासुद्धा त्यांच्या संगीतसेवेबद्दल व असामान्य गायकीबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ प्रदान करून गौरवण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय पाठक यांनी आपल्या वेधक व वेचक शैलीत केले तर आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री सचिन देवळे यांनी केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील लिपिक श्री मिलींंद देशपांडे यांनी अस्खलित संस्कृत व मराठी सुभाषितांच्या संगतीने  सुंदररित्या केले त्यांना  सौ. डाॕ. प्रीती गोसावी यांनी सार्थ साथ दिली.
       यावेळी बहुसंखेने शालेय विद्यार्थी ,  पालक , परिसरातील नागरिक उपस्थित होते

  • 0
  • 00
  • 000
  • 00000
  • 1
  • 11
  • 111
  • 2
  • 22
  • 2536
  • 3
  • 321
  • 322
  • 323
  • 324
  • 4
  • 456
  • 6
  • 654
  • 7
  • 77
  • 78
  • 8
  • 85
  • 9995

 

नाद समर्थ

  • 14
  • 25
  • 253
  • 32
  • 325
  • 45
  • 55
  • 566
  • 5669
  • 568
  • 65
  • 666
  • 78
  • 85
  • 852