Print

१९८८ च्या बॅचचं गेट टुगेदर काल दुपारी आपल्या शाळेत पार पडलं. अमरावती, पुणे, मुंबई , बंगलोर , अहमदाबाद आणि अगदी इंग्लंड , अमेरिका , ॲास्ट्रेलियावरून माजी विद्यार्थी खास गेट टुगेदरसाठी आले होते. या माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले असता अगदी ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत ८८ च्या बॅचचे म्हणून त्यांनी ८८ हजाराचा निधी गोळा करीत  शाळेसाठी सुपुर्द केला.
 आपल्या अमोल वैद्यसह मनीबाईचे तेलंग सर,  सौ. संगीताताई शिंदे, सुशील  कोटेचा,राम मालाणी , अजय मगर, सुनील घोटेकर आदी माजी विद्यार्थी अमरावतीवरून मेळाव्यात सहभागी होते.
, श्री. जाजु सर , श्री. मुळे सर ,श्री. मानेकर सर, श्री.पाटणे सर, सौ. अळसपुरे मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम या आदरणीय माजी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल , श्रीफळ, बुके व चांदीचा शिक्का देऊन सत्कार केला.डॅा. मुरके ( काबरा ) , श्री जोग हेसुद्धा माजी विद्यार्थी अमरावतीचे सहभागी होते.