Print

स्थानिक शिक्षण क्षेत्रात नामांकीत असलेल्या श्री समर्थ विद्यालयात वर्ग ५ ते ९ आणि ११ वी चे निकाल दि १ व २ मे रोजी जाहीर करण्यात आले.
 यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांवर बक्षीसे व पारितोषिकांची जणू लयलुट झाली.
दि १ मे रोजी महाराष्ट्रदिनी मुख्याध्यापिका सौ. माधवी मंगरूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर वर्ग ५ ते ७ च्या एकूण १५ विभागांचा निकाल जाहीर झाला तर दि. २ रोजी वर्ग ८,९ व ११ चा निकाल जाहीर झाला . प्रत्येक वर्गातून गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्रत्येक वर्गाच्या पाचही विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. वर्ग ७ वीच्या कु प्रांजल मालोजी माने ह्या विद्यार्थीनीने ५ ते ११ मधून प्रथम येण्यासाठी बहुमान पटकावला.
वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर, हस्ताक्षर , इंग्रजी स्पेलिंग तथा वाचनालय समितीमार्फत सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धांमध्ये यशप्राप्त विद्यार्थ्यांना दासबोध व चाऊस डिक्शनरी तसेच डाॅ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांनी प्रोत्साहीत करण्यात आले.
 समर्थ शिक्षण संस्थेकडून दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम विद्यार्थी व विद्यार्थीनी पुरस्कार दिला जातो . यावर्षी हा पुरस्कार पुर्व माध्यमिक विभागातून श्रीहरी गिरीश देशपांडे व कु शरयू प्रसन्न मोहोड
यांनी पटकावला. माध्यमिक विभागातून चि. अव्दैत आनंद जोग व कु. श्रावणी अरूण शिंगणवाडीकर हे सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. कनिष्ठ महाविद्यालय गटातून कु सीमा मोहन पडघन
हिने हा पुरस्कार पटकावला. स्म्रुतीचिन्ह , प्रमाणपत्र  आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असते. संगणक विभागातर्फे प्रत्येक वर्गातून पहील्या आलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे देण्यात आली. परीक्षा विभाग, संगणक विभाग, समर्थ शिक्षण संस्था याशिवाय स्व. रेणू अघोर, कै. वि. दा.ब्रम्ह, कै. नि. त्र्यं. राजदेरकर, कै. ग. ना. लेले स्म्रुती पुरस्कार असे सुमारे २९० पुरस्कारांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव डाॅ. देवदत्त बोधनकर, सदस्य श्री रमेशपंत डांगे, मुख्याध्यापिका सौ माधवी मंगरूळकर , पर्यवेक्षिका सौ वीणा कारणकर, जेष्ठ शिक्षक दिनेश देशमुख, परीक्षा प्रमुख सचिन देवळे व धनंजय पाठक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
परीक्षा विभागाचे प्रा. राजेन्द्र राऊत ,श्री खोब्रागडे, सौ बावा, सौ. अवघड, श्रीमती बापट, सौ गणोरकर,  सौ तायडे ,कु डाखोरे ,श्री झाडगांवकर, श्री आखरे, श्री वसंत इंगोले ,श्री साठे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.