Print

डाॅ बाबासाहेबांचे संपुर्ण जीवनच प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे चरित्र अभ्यासले पाहीजे असे प्रतिपादन श्री एम एम डोंगरे यांनी काढले. श्री समर्थ विद्यालयात आज साजरा करण्यात आलेल्या भारतरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
समर्थ विद्यालयात आज बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी मंगरूळकर , उपमुख्याध्यापिका आरती काळे, पर्यवेक्षिका वीणा कारणकर, दिनेश देशमुख , विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शाळेचे शिक्षक मनोहर डोंगरे प्रमुख वक्ते होते. अथर्व पानबुडे या विद्यार्थ्यानेसुद्धा बाबासाहेबांची थोरवी सांगितली.
मतदार जाग्रुती कार्यक्रमांतर्गत बी एल ओ संजय गायधने यांनी मतदानाचे महत्व उपस्थितांना पटवून देत सोमवारी आयोजित मतदान जाग्रुती मोटरसायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. सीमा पेलागडे यांनी जयंती कार्यक्रमाचे संचालन केले.