Print


चिंतनातून आत्ममंथन होते त्यातून जीवनाच्या वाटचालीची दिशा व प्रेरणा मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंतनाची सवय लावली पाहिजे असे मार्गदर्शन मा.श्रीमती मोनिकाताई देशपांडे यांनी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले.
श्री समर्थ रामदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ विद्यालयात आयोजित दासनवमी उत्सव तथा मराठी भाषा दिनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून समर्थ दासबोध व संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक मा. मोनिकाताई देशपांडे बोलत होत्या.आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीने समर्थांच्या दासबोधाशी विद्यार्थी व  शिक्षकांना सहजावगत करतांना समर्थांच्या दासबोधातून विद्यार्थ्यांनी काय घ्यायचे याचे समर्पक विवेचन त्यांनी केले, त्यातील उत्तम व्यक्तीची लक्षणे विशेष लक्षवेधी ठरली.
समर्थ प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री वटक सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गायिलेले मनाचे श्लोक, करुणाष्टके,श्रीरामप्रार्थना यांनी मंगलमय वातावरण निर्मिती झाली होती. दासनवमी उत्सवासाठी समर्थ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री मोहन पुरोहीत, सचिव मा.डाॅ. देवदत्त बोधनकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ माधवी मंगरूळकर , प्रभारी उपमुख्याध्यापिका मा.सौ आरती काळे, पर्यवेक्षिका मा.सौ वीणा कारणकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
सत्र २०१७ - १८ मध्ये समर्थ शिक्षण संस्थेने वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून पुर्व माध्यमिक शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन व हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबविल होता ,यांत उल्लेखनीय प्रदर्शन केलेल्या तीस विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्पुर्वी मराठी भाषा दिनानिमित्य सकाळ विभागातर्फे विद्यार्थ्यांनी फलकांकीत म्हणी वाचनाचे सादरीकरण सौ. प्रीति बावा, सौ वैशाली मिटकरी, सौ सुनिता काटोले यांच्या मार्गदर्शनात केले.सौ लीना तिवारी यांनी प्रमुख वक्त्यांचा नेमक्या शब्दात महत्तम असा परिचय करून दिला.दासनवमी व मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे सहजसुंदर संचालन आणि आभारप्रदर्शन सौ सुप्रिया तायडे यांनी केले. सांस्क्रुतिक समिती प्रमुख श्री वटक सर व सौ पेलागडे मॅडम यांच्या चमुने मुख्याध्यापिका सौ मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रसादवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.मोठ्या संख्येतील विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली