Print

 

गेले सहा वर्ष आम्ही तुम्हाला जे चांगले संस्कार दिले आहेत त्याचा वारसा जोपासून सुजाण नागरीक बना , तुमच्या चांगल्या कामांसाठी आम्ही सदैव ठामपणे तुमच्या पाठीशी उभे असू असे सल्लावजा आश्वासन श्री समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ माधवी मंगरूळकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिले.
           समर्थ विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका सौ मंगरूळकर आपल्या शुभेच्छा व आशिर्वादपर अध्यक्षीय संबोधनात बोलत होत्या. व्यासपीठावर प्रभारी उपमुख्याध्यापिका सौ आरती काळे, वरीष्ठ शिक्षक श्री दिनेश देशमुख, श्री धनंजय पाठक, श्री सचिन देशमुख, श्री संजय गायधने, सौ. सारीका जोशी, सौ दिपश्री देशपांडे उपस्थित होत्या. सरस्वती व समर्थ प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. दहावीचे विद्यार्थी हर्षित निळकरी, अथर्व पांढरीकर, कु वैष्णवी सरडे, कु रूशिका ठाकरे, हर्षल इखार, पियुष कवठेकर , राम साबळे, जानव्ही सुने,आयुष शिरभाते,कनक टाकरखेडे,सामर्थ्य चाबुकस्वार, समीक्षा डंबीर यांनी आपल्या मनोगतांमधून शाळा व शिक्षकांप्रति  आपल्या संवेदनाचा तथा क्रुतज्ञता व्यक्त केली. सौ आरती काळे आणि गणित शिक्षक श्री धनंजय पाठक यांनी आपल्या भावगर्भ संबोधनातून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व शुभाशिर्वाद दिले. निरोप समारंभाचे सुंदर सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. मीना तेटू यांनी केले. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. श्री राजेन्द्र राऊत यांनी विद्यार्थ्यांना आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन केले तर बडनेरा मेघे तंत्रनिकेतनच्या प्रा सौ माधुरी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शन केले. वर्ग ९ चे वर्गशिक्षक श्री मधुसूदन वटक , श्री छगन आठवले, सौ प्रभावती परिहार, सौ मीना तेटू कु शिल्पा काळे, दहावीचे सुमारे २५० विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. अल्पोपहाराने या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.