Print

समर्थ विद्यालयातशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.          अमरावती दि.१५


स्थानिक श्री समर्थ विद्यालयात शनिवार दि १५ डिसेंबर रोजी शालेय  स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. आरती काळे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद् घाटन झाले, यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री डी. एम. देशमुख, श्री एम. जे. वटक प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेच्या विज्ञान समितीमार्फत  या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .
वर्ग ५ ते १० च्या एकूण ४१ बालवैज्ञानिकांनी प्रदर्शनात आपले माॅडेल्स सादर केले. टाकाऊ पदार्थांपासून स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती , रोबोट, राॅकेट लाॅन्चर, एटीएम , हायड्रोलिक लिफ्ट , रोप वे आदी माॅडेल्स विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले.
संस्थेचे कार्यकारीणी सदस्य मा. रमेशपंत डांगे आणि मुख्याध्यापिका मा.सौ.माधवी मंगरूळकर यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देवून प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे जातीने कौतुक केले.शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शनातील सहभागासाठी शाळेतून पाठवावयाच्या दोन माॅडेल्सची निवड या आयोजनातून करण्यात आली.
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विज्ञान समिती प्रमुख सर्वश्री सी. एन. आठवले, ध.म.पाठक, एस.आर.देशमुख,सौ. सीमा निमदेवकर, सौ.सुवर्णा गणोरकर,सौ.सुषमा गिरासे, सौ संगीता माथने, सौ सीमा पेलागडे, सौ मीना नालट, श्री पवार, श्री जिचकार यांच्यासह श्री सुरेश इंगोले,श्री अजय झाडगांवकर यांनी परिश्रम घेतले. अनेक पालकांनीसुद्धा प्रदर्शनास भेट देवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.